file photo

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दैनिक सामनातील रोखठोक सदरातून केंद्रीय तपास यंत्रणांवर (ED) खळबळजनक आरोप केला आहे. तसेच ईडी महाराष्ट्रातील (Maharashatra) एका नेत्याच्या इशाऱ्यावर काम करते, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच राजकीय विरोधकांवर कशी व कधी कारवाई करायची, त्याआधी बदनामीची मोहीम राबवायची. भाजपशी (Bjp) संबंधित एक-दोन लोकांनी अशा कारवाईसंदर्भात सोशल मीडियावर (Social Media) सूतोवाच करून धमकवायचे हा प्रकार मोदी यांची प्रतिष्ठा पंतप्रधान म्हणून धुळीस मिळवणारा आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

त्याचसोबत केंद्रीय तपास यंत्रणांचे एक बडे अधिकारी भेटले. त्यांना विचारले, ‘‘नक्की काय सुरू आहे?’’ त्यावर ते एका शब्दांत म्हणाले, ‘‘आम्ही ‘टार्गेट’वर काम करतोय.’’ याचा अर्थ सरळ आहे. यंत्रणांचे राजकीय ‘बॉस’ जे टार्गेट देतील त्यानुसार कारवाया होत आहेत.

मी त्यांना विचारले, ‘‘उद्या सरकार बदलले तर कसे कराल?’’ यावर ते म्हणाले, ‘नवे सरकार सांगेल तसे काम करू. त्यांना हवे ते करू’ याचा अर्थ स्पष्ट आहे. तो समजून घ्यायचा आहे.

मुंबई-महाराष्ट्रात पैसा आहे. त्यामुळे येथे प्रत्येक केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याला काम करायचे आहे. अशा अधिकाऱ्यांसाठी जो दिल्लीत Delhi) रदबदली करेल तो अधिकारी त्या नेत्याचे हुकूम ऐकेल. सध्या तेच सुरू आहे, अशी टीका राऊत यांनी या सदरातून केली आहे.