अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :-  तुला सरकारी नोकरी लागली तरच मी लग्न करेल नाहीतर मला विसर अशी अट मुलीने एका तरुणासमोर ठेवली होती. त्यामुळे त्याच मुलीशी लग्न करण्यासाठी लोणी येथील एका तरुणाने लष्करात नोकरी लागल्याचे भासवून लष्करी हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

मात्र तो फसला आणि आता तो तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. महेश भारत जगताप ( रा.लोणी, जिल्हा नगर) असे त्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, जगताप व संबंधित मुलीचे एका खाजगी संस्थेत काम करताना प्रेम जुळले मात्र त्या मुलीने जर तुला सरकारी नोकरी लागली तरच मी तुझ्या बरोबर लग्न करेल नाही तर नाही, असा इशारा दिला होता.

दरम्यान महेशने ती नोकरी सोडलेली होती व तो सरकारी नोकरीचा शोध घेत होता ते दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहत होते.

महेशला त्याच मुलीशी लग्न करायचे असल्यामुळे त्याने लष्कराचा गणवेश शिवला तसेच त्या गणवेशावर मेजर म्हणून त्याचे नाव त्याने टाकले त्याच्या गणवेशातील आपला फोटो त्याने त्या मुलीला पाठवला.

संबंधित मुलीने तू लष्करात केव्हा नोकरीला लागला याची विचारणा करून तू ज्या ठिकाणी लष्करामध्ये नोकरी करतो त्या ठिकाणचे मला फोटो टाक ण्याचे सांगितले होते.

त्यानुसार काल दुपारच्या सुमाराला महेश हा लष्कराचा गणवेश घालून लष्कराच्या हद्दीमध्ये गेला होता. त्या ठिकाणी लष्कराच्या सिक्युरिटी गार्डने त्याची चौकशी केली असता,

त्याने वेगवेगळ्या प्रकारची दिली. तसेच त्याचे ओळखपत्र तपासले असता ते बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.