file photo

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत परराज्यातून महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले.

याप्रकरणी डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर शहरात दोन ठिकाणी छापा टाकून अवैध व्यवसाय करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. या घटनेन शहरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान याप्रकरणी आरोपी 1) दीपक एकनाथ लांडगे वय 30, 2) सागर जाधव या आरोपी विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून एका पीडित परप्रांतीय ( बंगाली) महिलेची सुटका करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, डीवायएसपी मिटके यांच्या पथकाला शहरातील उपनगरांत सुरू असलेल्या या अवैध व्यवसायाची माहिती मिळाली होती. सावेडीतील वाणीनगर आणि केडगावमधील अंबिकानगरमध्ये चांगल्या वस्तीत फ्लॅट भाड्याने घेऊन तेथे घेऊन महिलांकडून हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता.

ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी एकाच वेळी दोन्ही ठिकाणी छापे टाकले. सावेडीत टाकण्यात आलेल्या छाप्यात दीपक एकनाथ लांडगे व सागर जाधव यांना अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातून एका महिलेची सुटका करण्यात आली.

केडगावमधील छाप्यात योगेश पोपट ओव्हाळ (रा. माळीवाडा अहमदनगर ) याला अटक करण्यात आली. तेथून दोन महिलांची सुटका करण्यात आली. या आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.