Maharashtra news : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्यातील संघर्ष अधिक टोकदार होताना दिसत आहे.

इकडे राणा दम्पत्याचा जामीन रद्द करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केलेले असताना राणी दाम्पत्य दिल्लीत जाऊन बसले आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख ठाकरे १४ मे रोजी मुंबईत सभा घेणार आहेत.

त्याच दिवशी राणा दाम्पत्य दिल्लीत हनुमानाची महाआरती करणार आहे.राणा दाम्पत्याने आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. आमदार राणा यांनी सांगितले की, शनिवारी १४ मे रोजी महाराष्ट्रातील जनता, शेतकरी, मजुरांसाठी, राज्यातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही दिल्लीतील हनुमानाच्या प्राचीन मंदिरात ९ वाजता महाआरती करणार आहोत.

त्या ठिकाणी हनुमान चालीसेचे वाचन करून महाराष्ट्र संकटमुक्त झाला पाहिजे, मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळाली पाहिजे यासाठी प्रार्थना करणार आहोत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची ही दुर्दशा झाली आहे. महाराष्ट्राला वाचवण्यासाठी हनुमान चालिसा पठण गरजेचे आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे, असे राणा यांनी सांगितले