अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- सुनेनेच आपल्या सासऱ्याला कु-हाडीने घाव घालूनव दगडाने मारून खून केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वाद आणि चारित्र्याचा संशय घेतल्याने सुनने हे धक्कादायक पाऊल उचलले.

मयत झालेत्या व्यक्तीचे नाव अर्जुन गोविंद हजारे (वय ६२ रा. चिचोंडी पाटील) नाव आहे. तर ज्योती अतुल हजारे (रा. चिंचोडी पाटील) असे त्या सुनेचे नाव आहे.

या प्रकरणी बाबासाहेब चंदु बनकर (वय ४२ रा. पिंपळगाव माळवी ता. नगर) फिर्याद दाखाल केली असुन नगर तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सुनेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत तालुका पोलिस ठाण्यातून मिळालेती माहिती अशी की अर्जुन हजारे यांचा मुलगा अतुल दोन वर्षा पासून बेपता असल्याने आपल्या सून आणि नातवा सोबत राहत होता .

तो सून ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून सोमवारी मध्यरात्री साडेबारा ते दीड पर्यंत भांडण सुरु होते . गराडी वस्ती वरील भाऊ गुजाबा हजारे यांच्या घरासमोरील रस्त्यावर हे भांडण झाले होते.

या भांडणामध्ये ज्योती हिने अर्जुन हजारे यांच्या डोक्यात, कपाळावर, तोंडावर दगड व कुन्हाडीने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी होऊन अर्जुन हजारे यांचा मृत्यू झाला.