Ahmednagar News : नगर-औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव शिवारात जालन्याहून पुण्याकडे जात असलेला ट्रक लुटणाऱ्या पाच जणांना पोलिसांना मुद्देमालासह अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. १० जुन रोजी रात्री जालना येथुन लोखंडी सळ्या भरुन घेवून जाणारा ट्रक (एमएच १२ केपी ३२९५) हा औरंगाबद ते अहमदनगर रोडने पुण्याकडे जाण्यासाठी निघाला असताना घोडेगाव शिवारात दोन मोटर सायकलवरुन आलेल्या

चोरांनी ट्रक चालकास चाकूचा धाक दाखवुन ट्रक व ट्रक चालकास ताब्यात घेवुन त्यास बळजबरीने घेवुन जावुन ट्रक मधील सळया व मोबाईल चोरुन घेवून सदरचा ट्रक हा खोसपुरी शिवारात रोडच्या कडेला सोडून निघुन गेले होते.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सुजित राजेंद्र चौधर, संकेत बद्रीनाथ बड़े, रोहन संजय चव्हाण , दतात्रय गोरक्ष साळुंके तर स्टील विकत घेतले म्हणून शंकर आसाराम घोडके यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील जवळपास पाच लाखाचे स्टील हस्तगत केले आहे.