संप अटळच ! राज्य सरकारचा जीआर एसटी कर्मचारी संघटनांना अमान्य

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- राज्य शासनाच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाने एक समिती गठीत करण्याचा जीआर काढला आहे. मात्र, हा जीआर अमान्य असल्याचं सांगत एसटी कर्मचाऱ्यांनी आपण संपावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण, वेतन व इतर मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून एसटी कामगारांनी संप सुरु आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

राज्याचे मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष असणार आहे. यासंदर्भातील जीआर काढला आहे. परंतु हा जीआर कर्मचारी संघटनेने अमान्य केला असून

संपावर कायम राहणार असल्याचे सांगितले.संपाच्या 11 व्या दिवशीही तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमदार पडळकरांचे टीकास्त्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काल परत बीडमधील एका एसटी कामगार बांधवाने आत्महत्येचा प्रयत्न केला.

डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून या कर्मचाऱ्याला वाचवले असले तरी त्याची प्रकृती नाजूक आहे. आतापर्यंत 31 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पण हे प्रस्थापितांचं सरकार झोपेचं सोंग घेतंय आणि कोर्टाची दिशाभूल करतंय.

जर यांनी वेळेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली असती तर 31 जणांचे प्राण वाचले असते आणि महाराष्ट्रातील जनतेची गैरसोय टळली असती, असं पडळकर म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!