अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- घरासमोर लावलेली चारचाकी वाहन चोरीला गेले. अहमदनगर शहरातील केडगाव उपनगरामध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली.

सुरेंद्र जोगेंद्र सोनी (वय 61 रा. भंडारी चौक, भूषणनगर, केडगाव) यांनी घरासमोर त्यांची कार (एमएच 16 बीवाय 3731) ही उभी केली होती.

चोरट्यांनी बुधवारी रात्री साडे आठ ते गुरूवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान वाहनाची चोरी केली.

सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक विष्णू भागवत पुढील तपास करीत आहेत.