मुंबई : मनसे (Mns) नेते राज ठाकरे (raj thackeray) हे येत्या ५ जून रोजी अयोध्येला (Ayodhya) जाणार असून राजकीय वर्तुळात मात्र वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र या चर्चेला मनसे नेत्याने पूर्णविराम दिलेला आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांनी मीडियाशी संवाद साधताना अयोध्येचा दौरा हा कोणताही इव्हेंट (Event) नसून या दौऱ्यातून आम्ही रामलल्लाचं दर्शन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बाळा नांदगावकर म्हणाले, येत्या ५ जूनला अयोध्येला जाणार आहोत. त्याचं प्लानिंग सुरू आहे. कसं जाणार? कधी जाणार याची यावेळी चर्चा करण्यात आली. त्याबाबत सूचना केल्या आहेत.

५ जूनचा दौरा कसा करावा? तिथे गेल्यावर काय करायचं त्यावर चर्चा सुरू आहे. आम्ही अयोध्येत रेकी करून आलो आहोत. अजूनही अयोध्याला जाऊन पाहणी करणार आहोत.

कशा प्रकारे काय करायचं ते पाहू. एकदा जाऊन आलो पुन्हा जाणार आहोत. आमचा अयोध्या दौरा हा इव्हेंट नाही. दर्शन आहे, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, अयोध्या दौऱ्यासाठी रेल्वे उपलब्ध व्हाव्यात म्हणून नितीन सरदेसाईंकडे जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना (Raosaheb Danve) त्यांनी पत्र दिलं आहे. आम्ही दानवेंच्या संपर्कात आहोत, असे बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

तसेच राज ठाकरे यांच्या सुरक्षेबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी गृहमंत्र्यांना आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. सुरक्षेबाबतचं हे पत्र आता जाईलच. सरकारच्या बैठका सुरू आहेत. सरकार काय निर्णय घेतं. त्यावर ठरवू. वाय प्लस सुरक्षा होती. झेड सुरक्षा करण्याची मागणी केली आहे, असेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.