file photo

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कारणातून देखील आत्महत्या होऊ लागल्या आहेत.

अशीच एक घटना नुकतेच नगर शहरात घडली असल्याची माहिती समोर आली आहे. नगर शहरातील बोल्हेगावातील तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

तर शुक्रवारी दातरंगे मळात एका तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. महेंद्र नागेश नामन (वय 23) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, महेंद्र नामन याने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने सिंलींग फॅनला गळफास लावून घेत आत्महत्या केली.

शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. महेंद्र याने आत्महत्या का केली, याचे कारण अस्पष्ट आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.