file photo

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- नगर जिल्ह्यातील संगमनेर शहर हे कोरोनाबाधित रुग्णसंख्येत अग्रेसर आहे. संगमनेरची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसून येत आहे. कंटेन्मेंट झोन करूनही यश का मिळत नाही, हा आता परीक्षणाचा विषय बनला आहे.

कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन पूर्णपणे काळजी घेत आहे. सर्व उपाययोजना करूनही कोरोना नियंत्रणात न आल्यास संगमनेरमध्ये पूर्ण लॉकडाउन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.

संगमनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने या पार्श्वभूमीवर त्यांनी संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी हा इशारा दिला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, संगमनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. संगमनेर शहर आणि तालुक्यातील टेस्टिंग वाढवावी, संगमनेरची परिस्थिती चिंताजनक असून, लोकसंख्येच्या तुलनेत 25 टक्के नागरिक या ठिकाणी बाधित झालेले आहेत.

चाचणीत दहा रुग्ण आढळल्यास तो परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात यावा, अशा परिसराचे शंभर टक्के व्हॅक्सिनेशनला प्राधान्य देण्यात यावे. पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच पदाधिकारी याबाबत प्रतिसाद देणार नसेल,

तर त्यांना नोटीस पाठवणार आहोत. शिस्तभंग केल्यास तलाठी, ग्रामसेवक, सरपंच त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.