file photo

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- वासा तालुक्यातील घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये नेवासा तालुक्यासह जिल्हाभरातुन तसेच राज्यभरातून कांद्याची आवक होते.(Ahmednagar onion news) 

उच्च प्रतीचा कांदा माल व योग्य व्यवस्थापन यामुळे देशभरातून कांदा खरीदीदार घोडेगाव कांदा मार्केट येथे कांदा खरेदीसाठी येतात व प्राधान्य देतात.

दरम्यान नुकतेच नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव मार्केटमध्ये शनिवारी कांद्याच्या आवकेत जवळपास 14 हजार गोण्यांनी वाढ झाली. एकूण 38 हजार 404 गोण्या आवक झाली.

जाणून घ्या कांद्याला मिळालेला भाव

उन्हाळी कांद्याच्या मोठ्या मालाला 3200 ते 3400 रुपये

मध्यम मोठ्या मालाला 3000 ते 3100 रुपये

मध्यम मालाला 2000 ते 2100 रुपये

गोल्टी कांद्याला 1700 ते 1900 रुपये

गोल्टा कांद्याला 1600 ते 1800 रुपये

जोड कांद्याला 400 ते 500 रुपये एक-दोन वक्कलला 3600 ते 3700 रुपये

नवीन कांद्याला 500 ते 3000 रुपये इतका भाव मिळाला.