अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय यांचा विवाहसोहळा बुधवारी रात्री बुऱ्हाणनगर येथे पार पडला.(Shivajirao Kardile )

या सोहळ्यात चोरट्यांनी आपला हात साफ करून घेतला. विवाहसोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या वराडीच्या गळ्यातील ९८ हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अण्णा सोपान जगताप यांनी फिर्याद दिली आहे. अक्षय कर्डिले यांच्या विवाहसोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

त्याठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात केला होता. चोरट्यांनी गर्दीचा डाव साधत अण्णा जगताप यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून नेली.

जगताप यांच्या ही घटना लक्षात येईपर्यंत चोरटे पसार झाले होते.

विवाहसोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे.