Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी या गावात चोरीच्या घटना घडत असल्याने संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे पोलीस ठाण्यापासून जवळच मुख्य रस्त्यावर असलेल्या किराणा दुकान तसेच एक पतसंस्थेत अज्ञात चोरट्यानी चोरी केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.

या बाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी याच गावात प्रचंड धुमाकूळ घालत एकाच दिवशी पाच ते सहा दुकाने फोडून मोठा मुद्देमाल लंपास केला होता. याचा अद्याप तपास लागला नाही आणि परत एकदा चोरी झाल्याने नागरिक संतप्त झाले व त्यांनी याच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन केले.

मागील महिन्यात एकाच रात्री १० ठिकाणी चोरी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. तरी पोलिसांना चोर पकडता आले नाही. फक्त बेलवंडी मध्येच चोरी करणारे चोर पोलिसांना का सापडत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.