अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील शेतकरी सोपान मोहन काळे (वय-७२)यांच्या काळे वस्तीवरून चोरट्यानी पाच हजार रुपये किमतीच्या लक्ष्मी कंपनीच्या पाच अश्वशक्तीच्या विद्युत पंपावर डल्ला मारला आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहित अशी कि, कोपरगाव शहराच्या पूर्वेस साधारण बारा कि. मी.अंतरावर असलेल्या दहिगाव बोलका येथील गट क्रं.२७८/५ मधील शेतातील विहिरीत असलेल्या विद्युत पंपावर डल्ला मारला असल्याची खबर आली आहे.

या घटनेत दि.२२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शेतकरी सोपान काळे हे आपले शेतातील काम आटोपून घरी आले असता त्यांच्या पाळतीवर असलेल्या चोरट्यांनी रात्री कधीतरी डल्ला मारला आहे.

या प्रकरणी दुसऱ्या दिवशी ते शेतात नियमित काम करण्यास गेले असता हि चोरी लक्षात आली आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.म्हस्के हे करीत आहेत.