अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- नगरच्या रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या रेल्वे वसाहतीत रेल्वेचे विभागीय अभियंता शिशीरकुमार शंभुनाथ सिंग यांच्या राहत्या घरातून भरदिवसा रोख रक्कम व सोन्याचे दागीने असा 6 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी सिंग यांनी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अभियंता शिशीरकुमार हे कुटुंबियांसह रेल्वे वसाहतीत

सरकारी कॉर्टरमध्ये राहत असून सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास त्यांचे कुटुंबिय घराला कुलूप लावून बाहेर गेलेले असताना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरटयांनी घरातील कपाटाची उचकापाचक करत कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागीने व रोख रक्कम असा 6 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

सायंकाळी सिंग कुटुंबिय घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी सिंग यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.