file photo

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :-  यंदाचे साल २०२२ हे सिने रसिकांना साठी विशेष आनंददेणारे ठरणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मचे सर्व प्रेक्षक ज्या नव्या वेब सिरीजचे वाट पहात आहेत. त्या लवकरच प्रक्षेकांच्या भेटीला एणार आहेत.

नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, सोनी लिव, जी ५ आणि डिझ्नी प्लस हॉटस्टार वर गाजलेल्या काही वेब सेरिजचे राहिलेले भाग (season two ) लवकरच दाखवले जाणार आहेत.

मागील २ वर्षांपासून कोरोनामुळे चित्रपट गृहे बंद व निम्म्या क्षमतेने चालू होती. याचा संपूर्ण फटका चित्रपट व्यवसायाला बसला. पुन्हा कोरोनाचे सावट गडद होऊ लागल्याने लॉकडाऊन शक्यत व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नव्या वर्षात प्रदर्शित होणारे सिनेमांनी पुन्हा आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.

कोरोना सुरुवात झाल्यावर सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्व रसिक आणि निर्माते यांनी आपला मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळविला होता. तेव्हा अनेक चित्रपट व वेब सिरीझ ओटीटीवर प्रदर्शित झाले होते. प्रेक्षकांनी या वेब सिरीजना लोकांनी अक्षरशा: डोक्यावर घेतले होते. त्यात भर म्हणून नवे कोरे सिरीज देखिल चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.

ओटीटी प्लॅटफॉर्म येणाऱ्या वेबसिरीज….

१) डिझ्नी प्लस हॉटस्टार वर अजय देवगनची रुद्र ही वेबसिरीज येत आहे. यात अजय देवगणची वेबसिरीजच्या दुनियातील पहिलीच एन्ट्री असणार आहे.

२) नेटफ्लिक्ससाठी संजय लिला बन्साळी हे ‘हीरामंडी’ वेबसिरीज बनवत आहेत. लवकर ती प्रेक्षांच्या भेटीला येणार आहे.

३) ब्रीद अमेझॉन प्राइम व्हिडिओ वरील अभिषेक बच्चन, अमित साध आणि नित्या मेनन यांची गाजलेली वेब सिरीज ब्रीदचा पुढचा सीझन येत आहे.

४ ) पंचायत अमेझॉन प्राइम वरील लोकप्रिय पंचायत या सिरीजचा पुढील भाग यंदा रसिकांना पहायला मिळेल. जितेंद्र कुमार हा सध्या वेब सिरीज नवा स्टार मानला जात आहे. त्याच्या कोटा फॅक्टरी या वेब सिरीजने चाहत्यांची मने जिंकली आहेत. पंचायत या ग्रामीण भागतल्या गमती जमती असणाऱ्या वेब सिरीजला चांगली लोकप्रियता मिळाली होती.

५) दिल्ली क्राइम सीजन २ नेटफ्लिक्स वरील शेफाली शाह हीची दिल्लीतील निर्भया घटनेवर आधारीत दिल्ली क्राइम ही वेब सिरीज खूपच गाजली होती. समिक्षकांनी देखिल या वेब सिरीजला नावाजले होते.

शिवाय मागील वर्षातील ती सर्वोत्कृट वेब सिरीज ठरली होती. नेटफ्लिक्स ‘दिल्ली क्राईम’चा पुढील भाग घेऊ येत आहे. अलीकडील काळात प्रेक्षकांचे मनोरंजनाचे माध्यम बदलत चालले आहेत.

इंटरनेच्या सुविधेमुळे लोकांचा घरच्या घरी मनोरंजन करुन घेण्याचा कल वाढत आहे. कोरोनासारख्या संकटामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म देखिल मोठा प्रेक्षक वर्ग मिळाला आहे.