file photo

मुंबई : देशात इंधनाचे दर (Fuel rate) गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्य लोक यामध्ये भरडले जात आहेत. तरीही मोदी (Modi) सरकारकडून यावर कोणताही निर्णय घेतला जात नाही.

काँग्रेसचे (Congress) मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर इंधन दरवाढीवरून जोरदार निशाणा साधला आहे.

अतुल लोंढे म्हणाले, पेट्रोल, डिझेल, गॅसच्या महागाईने देशात नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. जनता इंधन दरवाढीने  होरपळून गेली असताना महागाईचे (Inflation) खापर राज्य सरकारांवरच फोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जबाबदारी झटकली आहे.

पंतप्रधान मोदी यांची ही कृती ढोंगीपणाच्या सर्व सीमा पार करणारी आहे अशी घणाघाती टीका अतुल लोंढे यांनी मोदींवर केली आहे.

अतुल लोंढे पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना पेट्रोल, डिझेल, गॅसच्या महागाईवर तत्कालीन युपीए सरकारवर कठोर शब्दात टीका करत असत.

केंद्र सरकार (Central Goverment) महागाई कमी करण्यासाठी काहीही करत नसून लूट करत असल्याचा आरोप ते करत, आता स्वतः नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना ते इंधन दरवाढीस मुख्यमंत्री जबाबदार आहेत असा कांगावा करत आहेत असेही लोंढे म्हणाले.

तेसच महागाईचा ‘म’ सुद्धा पंतप्रधानांच्या तोंडून निघत नाही असे म्हणारे मोदी आता मात्र जबाबदारी झटकत आहेत हा ढोंगीपणाचा कळस आहे. केंद्र सरकारने दर कमी केले तसेच भाजपाशासित राज्यांनीही व्हॅट कमी केला आहे.

परंतु महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांनी कर कमी केले नाहीत, ही राज्य सरकारे जनतेची लूट करत आहेत असा उलटा आरोप पंतप्रधानांनी केला.

हा आरोप करत असताना पंतप्रधान मोदी हे विसरले की मागील 8 वर्षात त्यांच्याच सरकारने इंधनावरील करातून तब्बल 26 लाख कोटी रुपये कमावले असेही अतुल लोंढे म्हणाले आहेत.

अतुल लोंढे यांनी डॉ. मनमोहनसिंह यांच्या काळातील पेट्रोल डिझेलवरचा कर किती होता याची सुद्धा आठवण करून दिली आहे. डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकार असताना 2014 पर्यंत पेट्रोलवर 9.48 रुपये तर डिझेलवर 3.56 रुपये कर होता

आणि रोड इन्फ्रॉस्ट्रक्चर कर मात्र 1 रुपये होता. मोदी सरकारच्या काळात पेट्रोलवर 32.90 रुपये, डिझेलवर 31.80 रुपये व रोड टॅक्स 18 रुपये, कृषी सेस 2 रुपये व 4.50 रुपये पेट्रोल व डिझेलवर लावला जात आहे.

यातून मोदी सरकारने जनतेच्या खिशावर दरोडा टाकला हे त्यांच्या लक्षात नसावे. चार महिन्यापूर्वी पोटनिवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाल्यानंतर 10 रुपये पेट्रोल व डिझेल ५ रुपयांनी कमी केले

आणि पाच राज्यातील निवडणुका संपताच पुन्हा पेट्रोल 10 रुपयांनी वाढवले यात मोदी सरकारने जनतेला दिलासा दिला असे कसे म्हणता येईल ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.