सिवान : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लाऊड स्पीकर्सवर अजान (Ajaan) पठण करण्यावरून कडक भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashatra) राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे.

राज्यात चालू असलेल्या वादात आता सिवानमधील (Siwan) जेडीयू खासदार कविता सिंह (MP Kavita Singh) आणि त्यांच्या पतीनेही उडी घेतली आहे.

खासदार कविता सिंह आणि त्यांचे पती अजय सिंह (Ajay Singh) सोमवारी सिवानमध्ये आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा हनुमानाचा देश असून अजान पठण करायचे असेल तर पाकिस्तान (Pakistan) मध्ये जावे असे विधान केले आहे.

तर खासदार कविता सिंह म्हणाल्या की, “सनातन धर्म सर्वात आधी आला आहे. आपला धर्म सुरुवातीपासूनच पुढे आहे. तुम्ही कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवू शकता, पण जो सनातन धर्म सर्वात पुढे राहिला आहे, त्यावर राजकारण होता कामा नये. हनुमान चालीसा मन लावून वाचावी, घरी वाचावी किंवा कुठेही वाचावी, त्यावर राजकारण होता कामा नये.”

दरम्यान, जेडीयू नेते अजय सिंह यांनी अजान आणि हनुमान चालीसावरून वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, “हा हनुमानाचा देश आणि पाकिस्तानचा अजान आहे. पाकिस्तानात अजान होते, कोणीही रोखायला जात नाही.

हा हनुमानाचा देश आहे, इथे हनुमान चालीसा होईल. येथे हनुमानावर बंदी घालणाऱ्यांचा नायनाट होईल. जळून जातील. हनुमानावर बंदी घालणाऱ्यांची जळून राख होईल.

जसे की लंका जळून राख झाली. हनुमान चालीसा शतकानुशतके म्हटली जात आहे आणि म्हटली जाईल.” तसेच अजय सिंह यांनी पुढे पुनरुच्चार केला आणि सांगितले की अजान पाकिस्तानमध्येच झाली पाहिजे.