Abdul Sattar and Supriya Sule : गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरत टीका केली होती. त्यानंतर राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच कार्यकर्त्यांकडून अब्दुल सत्तारांचा निषेध केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये आक्रमक होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राज्यातील अनेक पक्षाकडून अब्दुल सत्तार यांचा निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच अब्दुल सत्तर यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटीत कामगार विभाग प्रदेशच्या उपाध्यक्ष रेखा तौर यांनी थेट अब्दुल सत्तार यांना ललकारले आहे. अब्दुल सत्तार यांची कपडे फाडणाऱ्याला 10 लाख रुपयांचं बक्षीस देईन असे आव्हान केले आहे.

रेखा तौर म्हणाल्या, अब्दुल सत्तार यांनी जे बेताल वक्तव्य केलंय, त्याचा जाहीर निषेध करते. त्यांनी सुप्रिया ताईंचाच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व महिलांचा अपमान केला आहे. ते सुप्रियाताईंना भिकारी म्हटले आहेत.

अब्दुल सत्तार, तुला मी सांगू इच्छिते, सुप्रिया ताईंजवळ एवढं आहे की त्या तुला सात पिढ्या विकत घेऊ शकतील. पन्नास खोके, एकदम ओके. शिंदे गटाने पन्नास खोके घेऊन सरकार ओरबाडून आणली आहे.

पुढे बोलताना रेखा तौर म्हणाल्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना मी विनंती करते की, ते जिथे कुठे दौऱ्यावर असतील, त्याचे कपडे फाडा. जे कुणी कपडे फाडेल, त्याला १० लाख रुपये मी बक्षीस देईन.

ज्यांचं मन दुखावलं त्याची माफी मागतो म्हणाले, पण अब्दुल सत्तार तुझी दिलगिरी आणि माफीही नको. मुख्यमंत्र्यांना विनंती करते की, महिलांचा अपमान करणाऱ्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत वापरलेल्या अपशब्दाबद्दल तक्रार केली आहे. राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केली जात आहेत.