Amazon Prime Subscription : रिलायन्स जिओ आणि एअरटेल हे खूप लोकप्रिय टेलिकॉम ऑपरेटर आहेत. कंपनीच्या अनेक प्लॅनसह अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मेंबरशिप मोफत दिली जाते. याशिवाय यूजर्सना अनलिमिटेड कॉल्स, इंटरनेट आणि इतर फायदेही मिळतात.

Jio निवडलेल्या पोस्टपेड प्लॅनसह अॅमेझॉन Prime Video चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करते. यासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगआणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात. कंपनी 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 75GB डेटा देते. डेटा संपल्यानंतर, प्रति जीबी 10 रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय यूजर्सना नेटफ्लिक्स, Amazon Prime आणि डिस्ने + हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन देखील मिळतात.

कंपनी नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि डिस्ने + हॉटस्टारचे 599 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनसह सबस्क्रिप्शन देखील ऑफर करते. यामध्ये यूजर्सना 200GB डेटा रोलओव्हर दिला जातो. 150GB डेटासह Rs 799 चा Jio प्लॅन Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar च्या सबस्क्रिप्शनसह येतो.

याशिवाय तुम्ही 999 रुपयांचा प्लॅन किंवा 1499 रुपयांचा प्लॅन देखील घेऊ शकता. या योजनांसोबत OTT फायदे देखील दिले जातात. 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 200GB डेटा तर 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300GB डेटा दिला जातो.

Airtel चे चार पोस्टपेड प्लान OTT फायद्यांसह येतात. कंपनीचा 499 रुपयांचा प्लॅन Amazon Prime Video आणि Disney + Hotstar सबस्क्रिप्शन आणि 75GB डेटासह येतो. तर 999 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन 100GB डेटा, प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शनसह येतो.

याशिवाय Amazon Prime, Netflix आणि Disney Hotstar चे सबस्क्रिप्शन Rs 1199 आणि Rs 1499 च्या प्लान मध्ये दिले आहे. 1199 रुपयांच्या प्लॅनमध्ये 150GB मासिक डेटा येतो तर 1499 रुपयांचा प्लॅन 200GB डेटासह येतो.