Redmi smartphone: रेडमी इंडियाने (Redmi India) गेल्या आठवड्यात बजेट स्मार्टफोन रेडमी A1+ (Redmi A1+) लाँच केला. हा नवीन स्मार्टफोन लेदर-टेक्श्चर डिझाइनसह येतो. यात रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे.

याच्या मागील बाजूस 8-मेगापिक्सलचा ड्युअल एआय कॅमेरा देण्यात आला आहे. आता हा फोन आज पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट (flipkart) व्यतिरिक्त कंपनीच्या वेबसाइटवरूनही हा फोन विकला जाईल. त्याची संपूर्ण माहिती येथे दिली जात आहे.

Redmi A1+ किंमत आणि उपलब्धता –

Redmi A1+ भारतात दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 7499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर टॉप व्हेरिएंटमध्ये 3GB RAM सह 32GB इंटरनल मेमरी आहे. त्याची किंमत 8,499 रुपये ठेवण्यात आली आहे.

दोन्ही प्रकार लाइट ग्रीन, लाइट ब्लू आणि क्लासिक ब्लॅक कलर पर्यायांमध्ये खरेदी केले जाऊ शकतात. हा फोन आज दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट, mi.com, Mi Home आणि इतर रिटेल आउटलेटवर विकला जाईल.

लॉन्च ऑफर –

लॉन्च ऑफर (Launch offer) म्हणून कंपनी या फोनच्या खरेदीवर 500 रुपयांची सूट देत आहे. सवलतीनंतर, Redmi A1+ चा बेस व्हेरिएंट Rs.6,999 मध्ये खरेदी केला जाऊ शकतो तर त्याचा टॉप व्हेरिएंट Rs.7,999 मध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

Redmi A1+ चे तपशील –

Redmi A1+ मध्ये 6.52-इंचाची LCD स्क्रीन आहे. यामध्ये मीडियाटेक हेलिओए 22 (MediaTek HelioA22) चिपसेट देण्यात आला आहे. हे अँड्रॉइड 12 (Android 12) मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 8-मेगापिक्सलचा आहे. यासोबत 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे.

सेल्फीसाठी फोनच्या समोर 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 5,000mAh बॅटरी आणि 10W चार्जिंग सपोर्टसह येतो.