Maharashtra News:हिंदू धर्माचे धर्मगुरु शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती (वय ९९) यांचे मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमध्ये निधन झाले. अयोध्येतील राम मंदिर लढ्यात शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचा मोठा वाटा आहे.

स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. वेगवेगळ्या धार्मिक मुद्द्यांवरही त्यांनी रोखठोक मतं मांडली होती. १९८१ मध्ये त्यांना शंकराचार्य उपाधी देण्यात आली.

१९५० मध्ये त्यांनी ज्योतिषपीठाचे ब्रह्मलीन शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंदर सरस्वती यांच्याकडून दंड सन्यासाची दीक्षा घेतली होती.

शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला जाऊ नये अशी त्यांनी भूमिका मांडली होती. ते त्यांच्या भूमिकेवर अखेपर्यंत कायम राहिले. भाजप आणि संघाविरोधात भूमिका मांडल्याने अनेकदा ते चर्चेत आले. त्यांच्या भूमिकांविषयी वेळेवेळी देशभर चर्चा झाल्या.