यंदा 20 नोव्हेंबरपासून सनई चौघडे वाजण्यास सुरुवात होणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- सध्या करोनाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने गत वर्षीच्या तुलनेत यंदा विवाह सोहळे जोरात होण्याची शक्यता आहे. यंदा 20 नोव्हेंबरपासून सनई चौघडे वाजण्यास सुरवात होऊन 9 जुलै 2022 पर्यंत लग्न सोहळे पार पडणार आहेत.

त्यामुळे यावर अवलंबून असणार्‍या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. 15 ते 19 नोव्हेंबर दरम्यान तुलसी विवाह होताच लग्नसमांरभला सुरुवात होईल.

गतवर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत मोजकेच विवाह पार पडले. अनेकांनी साखरपुड्यातच विवाह उरकून घेण्यास पसंती दिली.

त्यामुळे यावर आधारित मंगल कार्यालये, आचारी, बँण्ड व अन्य व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. पण यंदा करोनाचा प्रादूर्भाव ओसरल्याने विवाहाची सनई निर्विघ्न पार पडणार आहे.

जाणून घ्या लग्नाचे मुहूर्त तारीखनिहाय :-

नोव्हेंबर 2021- 20, 21, 29, 30,

डिसेंबर-1, 7, 8, 9, 13, 19, 24, 26, 27, 28, 29,

पुढच्या वर्षी (2022) मध्ये असणारे लग्नाचे मुहूर्त :-

जानेवारी 2022- 20, 22, 23, 27, 29,

फेब्रुवारी-5, 6, 7, 10, 17, 19,

मार्च-26, 26, 27, 28,

एप्रिल-15, 17, 19, 21, 24, 25,

मे- 4, 10, 13, 14, 18, 20, 21, 22, 25, 26, 27,

जून- 1, 6, 8, 11, 13, 14, 15, 16, 18, 22,

जुलै- 3, 5, 6, 7, 8, 9.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!