file photo

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  महिलेसोबत गैरवर्तन करून तिला कुर्‍हाडीने हातपाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन काशिनाथ वाघमारे (रा. कोठला, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अहमदनगर शहरात राहणार्‍या पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.

29 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी फिर्यादी महिला ही पारनेर तालुक्यातील एका गावात राहत असलेल्या तिच्या आईला भेटून तिच्या घरी अहमदनगर शहरात आली.

त्यावेळी वाघमारे हा फिर्यादी महिलेच्या घरी आला. तुझी मैत्रिण कुठे आहे सांग नाही, तर तुझे हातपाय कुर्‍हाडीने तोडून टाकीन, अशी धमकी देत त्याने महिलेचा हात पिरगळून मारहाण केली.

तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. पीडिताने यासंदर्भात तिच्या जावयास माहिती दिली असता, वाघमारे याने त्यांनाही शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.