अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  तुमच्या मुलाला हात उसणे दिलेले पैसे परत द्या. नाहीतर तुमचे घर माझ्या नावावर करून द्या. असे म्हणत आरोपी सतीश वाघ याने एका वयोवृद्ध महिलेला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.(Ahmednagar Crime)

ही घटना २७ डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली आहे. तस्लीम बेगम मशीहूल हसन खान (वय ५०, रा. समर्थनगर, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे

कि, २७ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजे दरम्यान तस्लीम बेगम खान या त्यांच्या घरात होत्या. त्यावेळी तेथे आरोपी सतिष वाघ व इतर तीन अनोळखी इसम हे तस्लीम बेगम खान यांच्या घरात घुसले.

आणि त्यांना म्हणाले कि, तूमच्या मुलाला हात उसने दिलेले पैसे परत द्या. नाही तर तूमचे घर माझ्या नावावर करून द्या, असे म्हणल्याने यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली.

त्याचा राग आल्याने आरोपींनी तस्लीम बेगम खान यांना लाथा बूक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. तस्लीम बेगम खान यांनी ताबडतोब राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

आणि घडलेला प्रकार पोलिसांसमक्ष कथन केला. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसात आरोपी सतीश आनंदा वाघ (रा. अंबिका नगर, राहुरी फॅक्टरी) तसेच फॅक्टरी परिसरातील इतर तिघेजण अशा एकूण चार जणांवर मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.