Tiktok : बऱ्याच दिवसांपासून भारतात टिकटॉकवर बंदी (Ban on Tiktok) आहे. नुकतीच बीजीएमआय (BGMI) या गेमिंग ॲपवरही सरकारने (Government) बंदी घातली आहे त्यामुळे युजर्स (Users) कमालीचे निराश झाले आहेत.

अशातच या यूजर्ससाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. लवकरच हे दोन्ही ॲप (TikTok and BGMI) भारतात (India) परत येणार आहे.

काही महिन्यांपूर्वी अशी बातमी आली होती की TikTok च्या मालकीची कंपनी Byetdance (Byetdance) भारतात TikTok पुनर्संचयित करण्यासाठी मुंबईस्थित कंपनीशी बोलणी करत आहे. आता भारतीय गेमिंग कंपनी SkySports च्या CEO ने पुष्टी केली आहे की शॉर्ट-व्हिडिओ ॲप भारतात परत येत आहे. 

भारतात टिकटॉकचे सर्वाधिक वापरकर्ते होते. पण 2020 मध्ये देशात टिकटॉकवर बंदी घालण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षेच्या (National security) कारणास्तव TikTok सोबतच इतर 58 ॲप्सवरही बंदी घालण्यात आली होती. 

BGMI वर बंदी घालण्यासाठी कंपनी 5 महिन्यांसाठी विचार करत होती

SkySports चे CEO शिवा नंदी म्हणाले की TikTok लवकरच भारतात परत येईल. अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की, टिकटॉक पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. अशा स्थितीत बीजीएमआयचेही पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवा नंदी यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर दिलेल्या निवेदनात बीजीएमआय बंदीबाबत म्हटले आहे की, हा अचानक निर्णय घेण्यात आलेला नाही, सरकार जवळपास 5 महिन्यांपासून या बंदीचा विचार करत आहे. 

क्राफ्टन मुख्यालयाला अंतरिम नोटीस पाठवली

खरं तर, प्ले स्टोअरवरून गेम काढून टाकण्याच्या एक आठवडा आधी सरकारकडून क्राफ्टन मुख्यालयाला अंतरिम नोटीस पाठवण्यात आली होती. हा गेम स्टोअरमधून काढण्याच्या दोन दिवस आधी, आम्हाला याबद्दल माहिती होती. 

BGMI च्या भारतात परतल्याच्या वृत्ताला Crafton किंवा भारत सरकारने दुजोरा दिलेला नाही. जूनच्या सुरुवातीला, एका ET अहवालात म्हटले आहे की Bytedance भारतात TikTok पुनर्संचयित करण्यासाठी हिरानंदानी समूहाशी देखील बोलणी करत आहे. 

हिरानंदानी ग्रुप हा मुंबई, बंगळुरू आणि चेन्नई येथील देशातील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक आहे. सरकारी अधिकार्‍यांना या योजनांची माहिती देण्यात आल्याचेही वृत्त आहे. मात्र आजपर्यंत सरकारने आमच्याशी कोणतीही औपचारिक चर्चा केलेली नाही.