file photo

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या छळास कंटाळून जामखेड मधील एका विवाहितेने पोलीस ठाणे गाठून सासरच्या मंडळींविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

दिलेल्या फिर्यादीवरून सासरकडील एकुण ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत विवाहित ही मुळ रा. बेलवंडी स्टेशन. ता श्रीगोंदा (हल्ली रा. हळगाव ता. जामखेड) हीचे २०१३ रोजी लग्न झाल्यानंतर आपल्या सासरी बेलवंडी स्टेशन ता. श्रीगोंदा या ठीकाणी रहात होती.

सासरच्या मंडळी विवाहितेला घर बांधणे व पोल्ट्री फर्मच्या शेडसाठीच्या कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी माहेरुन ५ लाख रुपये घेऊन ये असे बोलून तिचा वारंवार छळ करत होते.

अखेर यास कंटाळून अखेर पिडीत विवाहित महिलेने जामखेड पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीवरुन सासरकडील एकुण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये पती सतिश महादु लाढाणे, दिर अनिल महादु लाढाणे, सासरे महादु किसन लाढाणे, सासु हौसाबाई महादु लाढाणे, उषा अनिल लाढाणे, किसन बाळु लाढाणे,

व आणखी एक (सर्व.रा. बेलवंडी, ता. श्रीगोंदा) व चांगुणाबाई बबन कापसे, बबन बापु कापसे दोघे (रा. हळगाव ता. जामखेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक साठे हे करत आहेत.