अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांना चक्क त्यांच्याच तालुक्यातील एका आरोग्य उप केंद्राचे उद्घाटन करण्यापासून रोखण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.(Ahmednagar news)

त्यामुळे तालुक्यात याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा नियोजनतंर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे ग्रामस्थांसाठी भगूर येथे आरोग्य उपकेंद्राचे काम पूर्ण झाले आहे.

त्यामुळे नवीन वर्षाच्या मुहूर्तावर या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या उद्घाटनास जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह सभापती क्षितीज घुले व काही कार्यकर्ते आले

मात्र यावेळी लाडजळगाव गटाच्या जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांच्या कार्यकर्त्यांनी या उपकेंद्रास टाळे लावत घुले यांना उद्घाटन करण्यास मज्जाव केला.

या उपकेंद्रासाठी काकडे यांनीच पाठपुरावा केला मात्र हर्षदा काकडे यांचे कोनशिलेवर देखील नाव नाही तसेच त्यांना निमंत्रित केले नसल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला. ऐन नवीन वर्षाच्या प्रारंभीच घुले-काकडे वाद उफाळल्याने रंगतदार चर्चा सुरू आहे.