अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज ४८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३७ हजार ३५२ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४१३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ६४१ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १९४ आणि अँटीजेन चाचणीत १२२ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, अकोले १८, कर्जत ०६, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०१, पारनेर १८, संगमनेर ४८, श्रीगोंदा ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, अकोले ०६,

जामखेड ०१, कर्जत १४, कोपरगाव ०२, नगर ग्रा.२८, नेवासा १०, पारनेर ०८, पाथर्डी ०६, राहाता ५३, राहुरी १८, संगमनेर ०५, शेवगाव १२, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर ०६, इतर जिल्हा ०७ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १२२ जण बाधित आढळुन आले.

मनपा ०३, अकोले १९, जामखेड ०२, कर्जत ०७, कोपरगाव ०५, नगर ग्रा. ०४, नेवासा ०३, पारनेर १५, पाथर्डी ०२, राहता ११, राहुरी ०९, संगमनेर २९, शेवगाव ०८, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान,

आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २४, अकोले ५२, जामखेड ०३, कर्जत २३, कोपरगाव १४, नगर ग्रा. ३८, नेवासा २९, पारनेर ५१, पाथर्डी १६, राहाता ५१, राहुरी ०७, संगमनेर १०२, शेवगाव २४, श्रीगोंदा २४, श्रीरामपूर १२ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:३,३७,३५२

उपचार सुरू असलेले रूग्ण:३६४१

पोर्टलवरील मृत्यू नोंद:६८८५

एकूण रूग्ण संख्या:३,४७,८७८

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)