अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  महिलेला धमकावत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नगर तालुक्यातील जेऊरमध्ये घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गोविंद मोकाटे याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, 20 नोव्हेंबर 2021 रा काळात माझ्या राहत्या घरी गोविंद अण्णा मोकाटे (रा. जेऊर, इमामपूर, ता.नगर) राने मला वेळोवेळी कॉल करून तसेच वेळोवेळी अश्‍लिल मेसेज पाठवून मला धमकावून देवून शारिरीक संबंधाची मागणी केली.

शारिरीक संबंधासाठी तु जर नाही ऐकलं तर गाठ माझ्याशी आहे, तुला पुर्णपणे बर्बाद करून टाकील. तुझ्या कुटुंबीयाना मारून टाकीन, अशी धमकी देवून शारिरीक संबंध केल्याचा आरोपावरून तोफखाना पोलिसांनी आज गोविंद मोकाटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित व्यक्तीचा राजकारणात दबदबा आहे. त्याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने नगर तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहेः.

आरोपी मोकाटेने धमकी देत वेळोवेळी आपल्यासोबत बळजबरीने शारिरीक संबंध केले.

मोकाटे आपणास धमकावून शारिरीक संबंध करत असताना संबंधित तक्रारदार महिलेचे मोबाईलमध्ये शूटिंग करत असत. असे दाखल फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.