अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- प्रेक्षकांची नजर खिळवून ठेवणारा रिऍलिटी शो म्हणजे बिग बॉस मराठीमध्ये दिवसेंदिवस वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहे. यातच आता एक महत्वाची बातमी या शो मधून येत आहे.

ती म्हणजे बिग बॉसच्या घरातून या हप्त्यात तृप्ती देसाई या आऊट झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचा या शोमधील प्रवास इथेच संपला आहे. बिग बॉस मराठी ३च्या घरातून तृप्ती देसाई रविवारी बाहेर पडल्या.

यावेळी तृप्ती देसाई यांना निरोप देताना बिग बॉसच्या घरातील अन्य सदस्यही भावूक झाल्याचं दिसून आले होते. तसंच निरोपाच्या वेळी तृप्ती देसाईदेखील भावूक झाल्या होत्या.

यावेळी त्यांनी सर्वांना चांगले खेळण्याचा सल्ला देत कधीही कॉल करा तुम्हाला नक्कीच मदत करेन, असं आश्वासनही दिलं. तसंच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना आपण लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, जय, सोनाली आणि तृप्ती देसाई या तीन जणांमधून आज कोणाला घराबाहेर जावे लागेल याबाबत प्रेक्षकांकडून तर्कवितर्क लढवले जात होते.

परंतु जय दुधाणे आणि तृप्ती देसाई हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये आले असल्याचं महेश मांजरेकरा यांनी सांगितलं. तृप्ती देसाई यांना या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.