अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- नेवासे शहरातील वडार गल्ली येथे खेळताना दोन लहान मुलांत झालेल्या भांडणावरून दोन गटांत तुंबळ ‘फ्री-स्टाईल’ मारामारी झाली. यात दोन्ही गटांतील एकूण पाच जण जखमी झाले.

याप्रकरणी मंगळवारी रात्री परस्परांविरुद्ध दिलेल्या फिर्यादींवरून नेवासे पोलिसांत एकूण सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 16 जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, याप्रकरणी मुक्ताबाई मोहन इरले (वय 55) रा. वडार गल्ली नेवासा खुर्द

यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, नेवासा खुर्द येथे वडार गल्लीत फिर्यादीचे राहत्या घरासमोर किरकोळ भांडणाच्या कारणावरून आरोपी मुकिंदा भीमराज आळपे याने त्याच्या हातातील चाकूने अजय संभाजी धोत्रे यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

आबा भीमराज आळपेने त्याच्या हातातील चाकूने साक्षीदार शुभम संभाजी धोत्रे यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी अशोक भीमराज आळपेने गजाने साक्षीदार संभाजी पिराजी धोत्रे याना मारहाण केली. तसेच आरोपी सुरेश भीमराज आळपेने साक्षीदार अशोक पिराजी धोत्रे यानं जबरी मारहाण केली.

तसेच आरोपी मोहन पिराजी डुकरे, सुनीता आबा आळपे, चांगुनाबाई भीमराज आळपे, सचिन रमेश धोत्रे व लक्ष्मी रमेश धोत्रे या पाच जणांनी फिर्यादी व साक्षीदार यांना खाली पाडून लाथाबुक्क्याने मारहाण, शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या मारहाणीत फिर्यादीसह अजय संभाजी धोत्रे व 3) शुभम संभाजी धोत्रे (दोघे रा.टाकळीभान ता.श्रीरामपूर), संभाजी पिराजी धोत्रे व अशोक पिराजी धोत्रे (दोघे रा.नेवासा खुर्द वडार गल्ली) हे पाच जण जखमी झाले.9 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान याप्रकरणी दुसरी फिर्याद आबासाहेब भीमराज आळपे (वय-34) रा.वडार गल्ली नेवासा खुर्द यांनी दिली. या फिर्यादीवरून मुक्ताबाई मोहन इरले, संदीप मोहन इरले, किरण मोहन इरले तिघे रा.नेवासा खुर्द, अशोक पिराजी धोत्रे, पिराजी धोत्रे, अजय संभाजी धोत्रे व शुभम संभाजी धोत्रे सर्व रा.टाकळीभान ता.श्रीरामपूर या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.