Twitter Owner Elon Musk:  ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांनी भारतातील कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे भारतात जवळपास 250 कर्मचारी होते.

कंपनीने कर्मचाऱ्यांना मेल पाठवून कळवले होते की, शुक्रवारी कामावरून कमी करण्यात येईल. इलॉन मस्कने नुकतेच ट्विटर विकत घेतले. मस्क ट्विटरचा मालक होताच, मस्कने प्रथम भारतीय वंशाचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह कंपनीच्या चार बड्या अधिकाऱ्यांना काढून टाकले.

यानंतर ट्विटरमधील अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात येणार असल्याचे मानले जात होते. ट्विटरने कर्मचार्‍यांना पाठवलेल्या मेलमध्ये असे म्हटले आहे की, ट्विटरला हेल्दी मार्गावर नेण्यासाठी, आम्ही शुक्रवारी जागतिक कर्मचारी संख्या कमी करण्याच्या कठीण प्रक्रियेतून जाऊ.

ट्विटरवर महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होईल, परंतु दुर्दैवाने ट्विटरला यशाच्या मार्गावर जाण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे.

हे पण वाचा :-  Chandra Grahan 2022 Time In India: यावेळी भारतात दिसणार चंद्रग्रहण, ग्रहणात करा ‘या’ गोष्टी ; वाचा सविस्तर