अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा परिसरात दुचाकीस्वारांचा भीषण अपघात झाला असल्याची घटना घडली आहे. या अपघातातील जखमींना परिसरातील नागरिकांच्या मदतीन रुग्णालयात दाखल केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, हरेगाव कडे जाणाऱ्या कमानी पासून काही अंतरावर असलेल्या हॉटेलसमोर भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वारांचा भीषण अपघात झाला आहे.

यामध्ये दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातात उंदीरगाव येथील दिलावर भाई यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने तसेच गणेश खिलारी यांना तोंडाला तसेच डोक्याला जबर मार लागला आहे.

सदर घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे याठिकाणी देण्यात आली यावरून पोलीस निरीक्षक संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.