Ahmednagar News : शिवण क्लास करून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा दोघा युवकांनी विनयभंग केला. ही घटना नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत कल्याण रोडवर घडली.

या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन बाळू जपकर व अमोल आजिनाथ होळकर (दोघे रा. नेप्ती ता. नगर) अशी आरोपींची नावे आहेत. पीडित अल्पवयीन मुलगी शिवण क्लास करून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तिला रस्त्यात थांबवले.

‘तू मला फार आवडतेस’, असे म्हणत तिचा नंबर मागितला. तिने नंबर देण्यास नकार दिल्यावर दोघा युवकांनी तिचा हात धरून ओढले व आमच्या बरोबर चल असे म्हणत तिचा विनयभंग केला. फिर्यादीच्या गावातील टेम्पो चालक तेथून जात असताना त्यांना पाहून आरोपी पळून गेल्याचे फिर्यादित म्हटले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप ढाकणे करत आहेत.