अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  येथील तोफखाना पोलीस ठाण्यात माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांच्यावर खोटा अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून

तो रद्द करण्याची मागणी मोकाटे यांच्या पत्नी मीना मोकाटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत निवेदन देण्यात आले आहे.(Ahmednagar Crime)

त्यात म्हटले आहे की, माझे पती गोविंद मोकाटे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जेऊर गटातून प्रबळ उमेदवार होते. त्यामुळे त्यांचे राजकीय विरोधकांनी षडयंत्र रचत एका महिलेमार्फत खोटा गुन्हा दाखल केला आहे.

सदर गुन्ह्यांमध्ये गोविंद मोकाटे यांचा कुठलाही संबंध नाही. खोट्या गुन्ह्यांमध्ये गुंतविण्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता व त्यांना सहकार्य करणार्‍या इतर दोन व्यक्तीं आहे.

गोविंद मोकाटे यांना ब्लॅकमेल करून अनेक महिन्यांपासून या व्यक्तींकडून पैशाची मागणी करण्यात येत होती. ज्या दिवशी फिर्याद देण्यात आली

ती खोटी असल्याबाबतचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना ते सर्व पुरावे सादर करण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.