Maharashtra News:अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भेट घ्यायची आहे.

त्यासाठी त्यांनी ऑर्थऱ रोड तुरुंग प्रशासनाकडे परवानगीही मागितली आहे. मात्र, ती नाकारण्यात आली आहे. राऊत यांची भेट घ्यायची असेल तर न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल.

कैद्यांना ज्यापद्धतीने भेटायची व्यवस्था असते तशीच व्यवस्था ठाकरे यांनाही राबवावी लागेल, असे तुरूंग प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांनी जेलरच्या रूममध्ये राऊत यांची भेट घेण्यासाठी परवानगी मागितली होती.

मात्र, अशी विशेष परवानगी देता येणार नाही. इतर सामान्य कैद्यांप्रमाणेच ठाकरेही राऊत यांची घेऊ शकतील असे तुरुंग प्रशासनाने त्यांना कळविले आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीने १ ऑगस्ट रोजी संजय राऊत यांना अटक केली.तेव्हपासून ते तुरुंगात आहेत.