मुंबई : राज्यात सध्या वातावरण हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरून गाजत आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदीवरील भोंग्या विषयी आक्रमक भूमिकेनंतर वातावरण चांगलेच तापले आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (Life Insurance Corporation of India) रौप्य महोत्सवात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चौफेर भाष्य केले आहे.

राज ठाकरे यांनी औरंगाबाद मध्ये सभा घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचीही सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलताना राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, राजकारणात देशाचे शत्रू बाजुला पडले आहेत. पण पक्षाचे शत्रू कोण कोणाकडे पाहिलं जातंय. घाणेरडं राजकारण सुरु झालंय. मुख्यमंत्री बनणे हे माझं स्वप्न कधीच नव्हतं.

पण मुख्यमंत्री माझ्या पक्षाचाच होईल हे माझं स्वप्न होतं. तसंच खासगीकरणाची खाज वाढत आहे. भविष्य अंधारात जाणार असेल तर आता तुम्ही कामाला लागणं पाहिजे.

दमदार वाटचाल सुरु असताना आता थांबायचं नाही. राज ठाकरे यांनी लावलेल्या सभांच्या धडाक्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आता थेट इशारा दिलाय.

14 तारखेला सभा घेतोय. अजून किती दिवस ऐकणार? काय तो सवाल जवाब होऊनच जाऊ दे असा थेट इशाराच राज ठाकरेंना दिला आहे.

बाबरी पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. तसेच आरोप करणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्यांवर तुटून पडा, सगळ्यांना सडेतोड उत्तर द्या.

त्यांचं हिंदुत्व कसं बोगस आहे हे सगळ्यांना दाखवा. आपली कामं लोकांपर्यंत पोहचवा असा आदेशच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी दिला आहे.