Maharashtra News:काही कामानिमित्त मोटारसायकलवर पुणे येथे गेलेल्या दोन मित्रांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्या दोघाचा मृत्यू झाला.

हनुमंत काळे व दत्ता पोपट काळे असे या अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. ते दोघेही श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील रहिवाशी होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हनुमंत काळे व दत्ता काळे हे दोघे त्यांच्या कामानिमित्त पुणे येथे जात होते. दरम्यान ते हडपसर परिसरात असताना भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या धडकेत दोघेही शेजारील फूटपाथवर पडल्याने गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी तात्काळ दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच हनुमंत काळे यांचा तर उपचारादरम्यान दत्ता काळे यांचा मृत्यू झाला.