file photo

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरातील कोठला परिसरातील घासगल्ली येथे पाथर्डी येथून खरेदीसाठी आलेल्या एका व्यावसायिकाची दोन लाख 15 हजार रूपयांची रोकड असलेली पिशवी दोन अज्ञात चोरट्यांनी टेम्पोच्या केबिनमधून चोरून नेली.

याप्रकरणी व्यावसायिक महेश शंकर इजारे (वय 41 रा. कसबा पेठ, पाथर्डी) यांनी फिर्याद दिली असून तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान दिवसाढवळ्या वाढत्या चोरीच्या घटनांनी आधीच नगर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी टेम्पो घेऊन खरेदीसाठी नगर शहरात आले होते.

शहरातील कोठला परिसरात असलेल्या घासगल्ली येथील शिवशक्ती ट्रेडर्स यांच्या जनसेवा ट्रान्सपोर्ट जवळ असलेल्या गोडाऊन समोर त्यांनी टेम्पो उभा केला होता.

दरम्यान खरेदीसाठी ते दुकानात गेले असता टेम्पोच्या केबिनमधील दोन लाख 15 हजार रूपयांची रोकड असलेली पिशवी अज्ञात दोन चोरट्यांनी टेम्पोचा दरवाजा उघडून चोरून नेली. याप्रकरणी इजारे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.