अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- नवीन दुकानाचे मोठ्या उत्साहात उदघाटन केले. मात्र काही काळातच कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांनी ते दुकान पुढील सात दिवसासाठी सील केले.

सध्या जिल्ह्यातील अनेक गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ती गावे लॉकडाउन करण्यात आली आहेत. त्याच सोबत जिल्ह्यात सर्वत्र प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

त्या अनुषंगाने कोरोनाचे या नियमांचे पालन करत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. दरम्यान पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी चौकातील एका सलून दुकानाचे उदघाटन करतांना कोरोना नियम पाळण्यात आले नाहीत.

तरुणांची अवास्तव गर्दी केली. याबाबत माहिती मिळताच पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी या दुकानावर कारवाई केली. पालिकेच्या पथकाला याबाबत कळवून सदरील दुकान ७ दिवसांसाठी सील करण्यात आले.