अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :-  शिवसेनेचे युवा पदाधिकारी विक्रम राठोड यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारीची तयारी करू नको, असा मजकूर असलेले निनावी पत्र मिळाले आहे. सदर पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे.(Ahmednagar Politics) 

पत्र प्राप्त होताच राठोड यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी अहमदनगर शहरातील चितळे रोडवरील शिवसेनेच्या कार्यालयात एक निनावी पत्र मिळाले आहे.

यामध्ये विक्रम राठोड यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी तयारी करू नको, असे म्हणत शिवीगाळ केल्याचा मजकूर आहे. सदर पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली.

पत्र प्राप्त झाल्यानंतर राठोड यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केेला आहे.

पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्‍वास भान्सी करीत आहे. दरम्यान युवासेनेचे पदाधिकारी असलेल्या राठोड यांना धमकीचे पत्र मिळाल्याने शहर शिवसेनेत खळबळ उडाली आहे