UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा (Competitive exam) पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत (Interview) होत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (IAS Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा (Interviewer) प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात.

UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न (Questions) येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्नः कोणत्या देशात विंचू तळून खातात?
उत्तरः चीन हा असा देश आहे जिथे विंचू तळून खातात. चीनमध्ये अनेक प्रकारचे प्राणी खाल्ले जातात.

प्रश्न: जगातील सर्वात मजबूत हाड कोणत्या प्राण्याची आहे?
उत्तरः वाघाचे हाड हे जगातील सर्वात मजबूत हाड आहे.

प्रश्न: ट्रेन रात्रीच्या वेळी जास्त वेगाने का धावते?
उत्तरः ट्रेन रात्रीच्या वेळी वेगाने धावते कारण रात्री ट्रॅकमध्ये देखभालीचे काम नसते. यासोबतच प्राणी किंवा मानव रात्रीच्या वेळी ट्रॅक ओलांडत नाहीत.

प्रश्न: अंतराळात जाणाऱ्या पहिल्या महिलेचे नाव काय आहे?
उत्तरः व्हॅलेंटिना तेरेश्कोवा.

प्रश्न: सोन्याची अशी कोणती वस्तू आहे, जी सोनाराच्या दुकानात मिळत नाही?
उत्तर: खाट.

प्रश्न: आपल्या देशाच्या पहिल्या संरक्षण मंत्र्याचे नाव काय आहे?
उत्तर : सरदार बलदेव सिंग.

प्रश्न: कोणत्या ग्रहावर सर्वाधिक चंद्र आहेत?
उत्तर: जुपिटर.

प्रश्न : देशातील लोकसभेचे पहिले सभापती ?
उत्तर : जी.व्ही.मावळंकर.

प्रश्न: आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान कोण होते?
उत्तर: पंडित जवाहरलाल नेहरू.