UPSC Interview Questions : UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

आज आम्ही तुम्हाला असेल काही प्रश्न घेऊन आलो आहे, ज्याची उत्तरे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

प्रश्न : 2022 मध्ये आयोजित दादासाहेब फाळके पुरस्काराचे कितवे संस्करण आहे?
उत्तर : 52

प्रश्न : 2022 मधील दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
उत्तर : आशा पारेख (कोविड साथीमुळे 2022 मध्ये त्यांना 2020 साठी पुरस्कार देण्यात आला)

प्रश्न : बी. सी. सी. आय चे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत?
उत्तर : रॉजर बिन्नी

प्रश्न : ९वी राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धा 2022 कोणी जिंकली आहे?
उत्तर : लद्दाख

प्रश्न : महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2020 कोणाला मिळाला आहे?
उत्तर : बद्रिनाथ तनपुरे

प्रश्न : दिलीप ट्रॉफी 2022 कोणत्या संघाने जिंकली आहे?
उत्तर : पश्चिम क्षेत्र