अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- नगर अर्बन बँकेच्या 18 जागांसाठी होत असलेल्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी एकूण 94 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

तर बँकेच्या दाखल केलेल्या नऊ उमेदवारी अर्जावर हरकती नोंदविण्यात आल्या असून, त्यावर बुधवारी सुनावणी घेण्यात आली. सदर उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्यासमोर करण्यात आली.

हरकती नोंदविण्यात आलेल्या अर्जदारांची नावे अनिल चंदुलाल कोठारी, दिपककुमार अमोलचंद गांधी, राजेंद्रकुमार आत्माराम अग्रवाल, शैलेश सुरेश मुनोत, अजय अमृतलाल बोरा, मनेष दशरथ साठे,

अशोक माधवलाल कटारिया, दिनेश पोपटलाल कटारिया, ज्ञानेश्वर कारभारी काळे या उमेदवारांच्या अर्जांवर हरकत घेण्यात आली आहे.

दरम्यान या निवडणुकीतील वैध उमेदवारांची यादी 8 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे उपनिबंधक आहेर यांंनी सांगितले.

छाननीवेळी बँकेच्या माजी संचालकांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली. आरबीआयने या संचालकांना अपात्र ठरविण्याचे आदेश काढलेले असून त्यांचे अर्ज अवैध ठरत असल्याचे हरकतदारांनी हरकतीत म्हटले आहे.

तसेच बँकेच्या थकबाकीदार असल्याचा चार ते पाच उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप नोंदविण्यात आला आहे.