अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :-औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यातून सराईतपणे चारचाकी व दुचाकी वाहने चोऱ्या करण्यात तो सराईत झाला. परंतु, अहमदनगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला सापळा रचून जेरबंद केला.

या आरोपीच्या ताब्यातून तब्बल सुमारे साडेचौदा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संजय रावसाहेब चव्हाण (रा. ब्राम्हणगांव, ता. श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे.

त्याने नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासे, सोनई, शेवगाव परिसरातून तसेच जालना, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातुन चारचाकी व दुचाकी वाहने चोरली.

सादिक इब्राहिम पठाण, (वय ४९ वर्षे, रा. काझीबाबा रोड, सुलतान नगर, ता. श्रीरामपूर) यांचा सुपर ऑटो कंसल्ट या नावाने पराग टॉवर्स, श्रीरामपूर येथे जुने चारचाकी वाहनांचे खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे.

त्यांचे ओळखीचे जनार्दन रामचंद्र बाबर (रा. भिंगार, ता. जि. नगर) यांनी त्यांची महिंद्रा बोलेरो गाडी विक्री करण्यासाठी गाडीचे कागदपत्रासह पठाण यांचेकडे दिली होती.

हे वाहन पिकअप पठाण यांनी त्यांच्या कार्यालयासमोर उभे केले होते. दि.१६ नोव्हेंबर रोजीच रात्री हे वाहन चोरीला गेले. याबाबत पठाण यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात वाहनचोरीचा गुन्हा नोंदवला.

गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी पकडल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने या गुन्ह्यातील ३ लाख ३५ हजार रुपयांची महिंद्रा बोलेरो दिली.

पोलिसांनी ती जप्त केली आहे. परंतु चौकशीमध्ये पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. संजयने विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली.