file photo

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- महावितरण कंपनीकडून शनिवारी (ता. २३) महत्वाच्या दुरूस्ती कामांसाठी शट डाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा होणार आहे.

या काळात मुळानगर, विळद येथील पंम्पिंग हाऊस येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहिल. त्यामुळे शहरातील पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही.

रविवार :- बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मी नगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच स्टेशन रोड, विनायक नगर, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर या भागात शनिवार ऐवजी रविवारी (ता. २४) पाणीपुरवठा हाेईल.

साेमवारी :- शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सर्जेपुरा, मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको या भागाला रविवार ऐवजी सोमवारी (ता. २५) पाणीपुरवठा हाेईल.

मंगळवारी :- सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्ली दरवाजा, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने महापालिका कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, सारसनगर, बुरूडगाव रोड परिसर व सावेडी भागाला साेमवार ऐवजी मंगळवारी (ता. २६) पाणीपुरवठा हाेईल.