अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- एका अल्पवयीन मुलीवर बळजबरी अनैतिक संबंध ठेवत तिच्या कुटुंबीयांना ब्लॅकमेल करण्यात आले. या प्रकरणाची पीडित मुलीच्या भावाला माहिती मिळताच त्याने आरोपी तरुणाचा काटा काढला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी अय्याज सिद्दीकी याने पीडित मुलीचा लपून आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट केला होता.

या व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत तो अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करत होता. वारंवार ब्लॅकमेल करुन आरोपी अय्याज याने पीडित मुलंसोबत लैंगिक संबंध ठेवले.

या संपूर्ण प्रकाराची माहिती पीडित मुलीच्या भावाला मिळाली. त्यानंतर संतप्त झालेल्या पीडित मुलीच्या भावाने आपल्या मित्राच्या मदतीने आरोपी अय्याज सिद्दीकी याचा काटा काढण्याचं ठरवलं.

त्यानुसार दोघांनी मिळून अय्याज सिद्दीकी याच्यावर चाकूने वार करत हत्या केली. त्यानंतर अय्याज सिद्दीकीयाचा मृतदेह एका कपड्यात गुंजाळून झुडपात फेकला.

रविवारी पोलिसांना झुडपात मृतदेह आढळला. या प्रकरणचा पोलिसांनी तपास सुरू केला असता. आरोपींच्या नातेवाईकांपैकी एक व्यक्तीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. अय्याज सिद्दीकीची हत्या चाकूने केली होती. या हत्येनंतर दोघांनीही चाकू तलावात फेकला होता. तसेच अय्याज सिद्दीकी याचा फोनही फोडून टाकला होता.