VIP Number Plate : आपल्या कार किंवा बाइकला व्हीआयपी नंबर असावा ही प्रत्येकाची इच्छा असते. पण अशा नंबर प्लेट्स खूप कमी उपलब्ध असतात त्यामुळे लोक भरपूर पैसे देखील खर्च करतात.

मात्र आज आम्ही तुम्हा अगदी सोपी प्रक्रिया सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही सोप्या पद्धतीने व्हीआयपी नंबर मिळवू शकतात.  यासाठी तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार. तर जाणून घ्या व्हीआयपी नंबरसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया.

अर्ज कसा करायचा

सर्वप्रथम तुम्हाला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. आता तुम्ही होम पेजवर जा आणि ऑनलाइन मेनूवर जा आणि फॅन्सी नंबरसाठी दिलेल्या पर्यायावर टॅप करा, त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

यानंतर, येथे नवीन सार्वजनिक वापरकर्त्यावर जा आणि नवीन वापरकर्ता आयडी तयार करा. यासाठी तुम्हाला तपशील द्यावा लागेल.

यानंतर, आयडीद्वारे लॉग इन केल्यानंतर एक इंटरफेस उघडेल. यानंतर, तुमच्या जवळील प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) कार्यालय निवडा.

यानंतर वाहन श्रेणी निवडावी लागेल. VIP क्रमांकांची यादी तुमच्या समोर येईल आणि त्यांची किंमतही समोर येईल.

हे सर्व केल्यानंतर, तुम्ही आता Continue to Register वर टॅप करा. यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म येईल. ते भरा, आता नंबर तुमच्या नावावर नोंदवला जाईल.

हे पण वाचा :- IMD Alert Maharashtra : नोव्हेंबरमध्ये राज्यात थंडी होणार गायब ! पुन्हा पाऊस घालणार थैमान ; हवामान खात्याने दिला ‘हा’ मोठा इशारा